अटल बीमीत व्यक्ति कल्याण योजना २०२०-२१

कोरोना काळात नोकरी गमावलेल्या नोकरदारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 'अटल बीमीत व्यक्ति कल्याण योजने अंतर्गत ESIC ने बेरोजगार भत्त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. दोन वर्षे नोकरी २४ मार्च २०२० ते ३० जून २०२१ दरम्यान बेरोजगार झालेल्या कामगारांना ही वाढ देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी संबंधित कर्मचारी  ESIC मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जे कामगार बेरोजगार झाले त्यांच्यासाठी नियम शिथिल करून ही वाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच ही योजना लागू होती. पूर्वी मिळणाऱ्या सरासरी पगाराच्या २५ टक्के भट्ट देण्यात येणार होता. आत्ता मात्र तो ५० टक्के करण्यात आला आहे. हा भत्ता जास्तीत जास्त ९० दिवसांचा असेल आणि तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी दिला जाणार आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपला अर्ज www.esic.in या संकेतस्थळावर लॉगिन करून भरावा. त्यानंतर त्याची प्रिंट, आधार कार्ड, पासबुक किंवा चेकच्या प्रतीसह आपल्या जवळच्या ESIC च्या कार्यालयामध्ये जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टीप : रोजगार गामावणाऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळते. हा एक प्रकारे बेरोजगारी भत्ता असतो. याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो, ज्याच्या मासिक पगारातून ESI योगदान कापले जाते. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा  : www.esic.in  

संपर्क : इन्फिनिटी ऑनलाइन सुविधा केंद्र, कान्हेवाडी. (रहिमान इनामदार ९५०३६३०२३२) 

Comments

Popular posts from this blog

अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online Maharashtra 2023

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार, पहा उपचारांची यादी | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023

पुणे जिल्हा परिषद लाभार्थी योजना.