अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online Maharashtra 2023
अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online Maharashtra 2023 E Peek Pahani Online Maharashtra राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल वरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून 15 ऑगस्ट 2021 पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. E Pik Pahani Maharashtra 2023 पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्यादृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे. या आज्ञावलीचा उपयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे.करंजपाडा येथे प्रायोगिक तत्वावर यशस्विरित्या करण्यात आला असून ई-पीक पाहणी प्रकल्पापूर्वी राज्यातील 20 तालुक्यांमध्ये या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. E-Peek Pahani Online Maharashtra ई-पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक...